राज्यातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गारठा अधिक जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशाराही दिला आहे.
गोंदियात राज्यातील नीचांकी तापमान
गोंदिया येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तेथे पारा ११.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. नागपूर येथे १३.८ अंश, वर्धा येथे १४ अंश, तर यवतमाळ आणि नाशिक येथे १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. हवेच्या दीड किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दिवसा उष्णता, रात्री थंडी
दुपारच्या वेळी प्रचंड उष्णता जाणवत असून, रात्री आणि सकाळी थंडी जाणवत आहे. विदर्भात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आजही तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील काही दिवसांत राज्यात उष्णता अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, तापमानात चढ-उतार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा