, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डिलिमिटेशनवरुन भाजपला पाठिंबा; पवारांच्या पक्षात नाराजी

डिलिमिटेशनवरुन भाजपला पाठिंबा देण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दर्शवल्यानंतर पक्षात नाराजी उसळली असून, कार्यकर्त्याची पोस्ट व्हायरल होत आहे.

डिलिमिटेशनवरुन भाजपला पाठिंबा; पवारांच्या पक्षात नाराजी

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून भाजपप्रणित एनडीएला पाठिंबा देण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दर्शवल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. डिलिमिटेशननंतर शरद पवार यांचा पक्षही सत्तेत सामील होईल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

काँग्रेस आणि मविआकडून तीव्र टीका

या निर्णयावरून राज्यातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर तुटून पडले आहेत. काँग्रेसने पवार यांचा पाठीत खंजीर खुपसण्याचा इतिहास असल्याचे म्हणत जुन्या घडामोडी उकरून काढल्या आहेत.

पक्षातही नाराजी; कार्यकर्त्याची पोस्ट व्हायरल

या सगळ्या घडामोडी सुरू असताना शरद पवार यांच्या स्वतःच्या पक्षातही डिलिमिटेशनसाठी भाजपला पाठिंबा देण्याबाबत नाराजी असल्याचे समोर येत आहे. कालपासून सोशल मीडियावर पक्षाचे अनेक सामान्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मण मारोतराव ईक्कर पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी लिहिले आहे की, आपली आजपर्यंतची संपूर्ण राजकीय वाटचाल केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहून केली. अजित पवारांनी पक्ष फोडल्यानंतरही कोणत्याही राजकीय फायद्याची अपेक्षा न ठेवता ते नेहमीच शरद पवार यांच्यासोबत राहिले आणि त्याचा त्यांना अभिमानही वाटत होता. छत्रपती शाहू, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांना शरद पवार कधीच तिलांजली देणार नाहीत, असा त्यांचा विश्वास होता. मात्र तो विश्वास आता धुळीस मिळाला असून, त्यासोबतच पवार यांच्याबद्दलचा आदरही गेला, असे त्यांनी म्हटले आहे. पवार यांच्या आतापर्यंतच्या सर्व निर्णयांचे — त्यातील काही निर्णय पटले नसले तरी — त्यांनी समर्थन केले होते. पण हा निर्णय पुरोगामी विचारांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला सहन करणे शक्य नाही, असे म्हणत त्यांनी विचार महत्त्वाचा आहे, पक्ष नाही, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance