, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विधेयकाला पाठिंबा म्हणजे देशाशी गद्दारी: प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांनी डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास ती देशाशी गद्दारी ठरेल, असे त्या म्हणाल्या.

विधेयकाला पाठिंबा म्हणजे देशाशी गद्दारी: प्रणिती शिंदे

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजपवर डिलिमिटेशन विधेयकावरून जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसने या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान केल्यास ती केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीशी केलेलीच नव्हे, तर देशाशीही केलेली गद्दारी असेल, अशी टीका त्यांनी केली. या विधेयकाचे समर्थन करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला एवढी मजबुरी का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसने नेहमीच साथ दिली

खा. शरद पवार यांना राज्यसभेची जागा देण्यासह विविध राजकीय प्रसंगांत काँग्रेसने नेहमीच त्यांना साथ दिली, असे खा. शिंदे म्हणाल्या. मात्र आता डिलिमिटेशनसारख्या देशाच्या हिताच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस भूमिका बदलत असेल, तर ही देशाशी केलेली गद्दारी ठरेल. पुरोगामी विचार, शाहू-फुले यांची विचारधारा आणि संविधानावर विश्वास ठेवून जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून दिले आहे. मात्र पक्षाची सध्याची भूमिका याच विचारांच्या विरोधात जाणारी असल्याची टीका त्यांनी केली. महिला आरक्षणासाठी खासदारांची संख्या वाढवण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला. ५४३ जागांमध्येच ३३ टक्के आरक्षण लागू करण्याची काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार फोडण्यासाठी पैशांची ऑफर?

महाराष्ट्रातील खासदार फोडण्यासाठी ५० कोटी रुपये, तर अन्य ठिकाणी १५० कोटी रुपयांची ऑफर असल्याची चर्चा आपण समाजमाध्यमांवर ऐकल्याचे खा. शिंदे म्हणाल्या. भाजपकडून अशा प्रकारची कटकारस्थाने केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही खासदारांशी आपले बोलणे झाले असून त्यांच्या भूमिकेत संभ्रम दिसत असल्याचेही खा. शिंदे यांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance