, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दीडशे कोटींची चर्चा आमच्या खासदारांपर्यंत नाही; लंके

डिलिमिटेशनवरून आघाडीत नाराजी असल्याच्या चर्चांवर निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले. अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे चुकीच्या पोस्ट करू नका, असे ते म्हणाले.

दीडशे कोटींची चर्चा आमच्या खासदारांपर्यंत नाही; लंके

संसदेमध्ये कोणतेही बिल येणार असेल तर राष्ट्रवादी शरद पवार गट हे ते बिल पाहणार व त्याचा अभ्यास करणार. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व खासदार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित चर्चा करून निर्णय घेतील, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी दिली. डिलिमेटेशनबाबतच्या चर्चा सध्या जोर धरत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार हे एनडीएला पाठिंबा देणार अशा चर्चा सुरू आहेत. यावर लंके यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीला अनुपस्थिती

इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे, मात्र या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार उपस्थित नाहीत, यावरूनही चर्चा सुरू आहे. यावर बोलताना लंके म्हणाले की, या बैठकीला नेहमी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असतात. मात्र शरद पवार यांची प्रकृती स्वस्थ नसल्याने सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यानंतर लंके यांना त्या बैठकीला जाण्यासाठी सांगितले गेले, मात्र त्यांचा पूर्वनियोजित दौरा असल्याने त्यांना जाणे शक्य झाले नाही. दौरा लवकर पूर्ण झाला तर आपण दिल्लीला जाऊ, असेही लंके यावेळी म्हणाले.

काँग्रेस नाराज व्हायचा किंवा शिवसेना नाराज व्हायचा काही संबंध नाही. आमचे घटक पक्ष शिवसेना असेल किंवा काँग्रेस, कोणीही नाराज नाही, कारण आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे लंके म्हणाले. डिलिमेटेशनबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने सोशल मीडियावर कोणत्याही पोस्ट करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दीडशे कोटींच्या आमिषाचा दावा

डिलिमेटेशन बिल मंजूर करण्यासाठी खासदारांना आमिष दाखवण्यात आले असून यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. या खासदारांना दीडशे कोटींचे आमिष दाखवण्यात आले आहे, असे राऊत म्हणाले होते. यावर बोलताना निलेश लंके म्हणाले की, संजय राऊत यांना काय माहिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. मात्र आपल्या कुठल्याही खासदारांपर्यंत दीडशे कोटींची चर्चा कानावर आलेली नाही, असे लंके म्हणाले.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance