सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईकडे जाणाऱ्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या घटनेमुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला असून त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास झाला. तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तब्बल दोन वेळा विमानातून खाली उतरवण्यात आले.
एसी बंद पडल्याने प्रवाशांचा त्रास
विमान दुरुस्त होईल या आशेने प्रवासी ताटकळले होते. मात्र बिघाड वेळेत दुरुस्त होऊ शकला नाही. एसी बंद असल्यामुळे विमानात बसणेही प्रवाशांसाठी कठीण झाले होते. दोनदा विमानातून उतरावे लागल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
बसने मोपा विमानतळावर हलवले
बिघाड वेळेत दुरुस्त न झाल्यामुळे विमान कंपनीने तात्पुरता उपाय म्हणून सर्व प्रवाशांना बसने गोव्यातील मोपा विमानतळावर हलवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, अनेकांच्या नियोजनावर याचा परिणाम झाला आहे. सिंधुदुर्ग विमानतळावरील या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अनपेक्षित प्रवासाला आणि विलंबामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले.
प्रतिक्रिया व्यक्त करा