छत्तीसगडच्या भाजप खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. खरोरा येथील बंगोलीजवळ हा अपघात घडला. त्या खरोराहून रायपूरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात लक्ष्मी वर्मा जखमी झाल्या असून कारचालकही जखमी झाला आहे.
## तातडीने रुग्णालयात दाखल
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. दोघांनाही जवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी लक्ष्मी वर्मा यांना रायपूर येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
## अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट नाही
ही घटना बंगोली पोलीस ठाण्याजवळ घडली असून खरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. अपघाताआधी वाहतूक कोंडी होती का, याचाही शोध घेतला जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा