आजकाल चहा प्रत्येक व्यक्ती पितो. चहा न पिल्यास अनेकांना अस्वस्थ वाटते, तर चहा पिल्यावर लगेच ताजेतवाने वाटते. दुसरीकडे कॉफी पिणाऱ्यांचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. त्यामुळे चहा आणि कॉफी यापैकी शरीरासाठी चांगले काय, हे जाणून घेऊ या.
दूध आणि साखर न घातलेला चहा किंवा ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण जवळपास शून्य असते. मात्र, दूध आणि साखर घातल्यानंतर या पेयांमधील कॅलरीज वाढतात. एक कप चहा किंवा कॉफीमधून साधारण ११० कॅलरीज मिळू शकतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी चहा-कॉफीमधील साखरेचे प्रमाण कमी ठेवावे.
## कॅफिनचे प्रमाण हाच मुख्य फरक
चहा आणि कॉफी यांमधील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे त्यातील कॅफिनचे प्रमाण. एक कप चहामध्ये साधारण ३० मिलीग्रॅम कॅफिन असते. तर एका कप कॉफीमध्ये हे प्रमाण ८० ते १०० मिलीग्रॅमपर्यंत असू शकते. त्यामुळे कॉफी पिल्यानंतर अधिक सतर्कता आणि ऊर्जा जाणवते.
## मर्यादित सेवनाचे फायदे
चहा आणि कॉफी या दोन्ही पेयांमध्ये शरीरासाठी उपयुक्त अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे दोन्ही पेयांचे मर्यादित सेवन केल्याने काही फायदे होऊ शकतात. मात्र, चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन्स असतात. त्यांचे अतिसेवन शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा