मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार हिंदी चित्रपटांत छोट्या भूमिका करतात किंवा नोकराची भूमिका करतात, यावर अभिनेते किरण करमकर यांनी आपले मत मांडले आहे. एका मराठी अभिनेत्याच्या विधानाशी असहमती दर्शवताना त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे उदाहरण दिले.
बेर्डे आणि सराफ यांचे उदाहरण देत काय म्हणाले करमकर
किरण करमकर म्हणाले की, एक अभिनेता नेहमी म्हणत असतो की मराठीत मोठे नट असलेले कलाकार हिंदीत नोकराची भूमिका करतात आणि छोटे छोटे रोल करतात. मात्र हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे करमकर म्हणाले. पैसे कसे कमवायचे आणि करिअर कसे घडवायचे, हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे असते. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनीही हिंदीत नोकराची भूमिका केली आहे. जे काम हाताला लागले, ते त्यांनी केले. दोघेही मराठी चित्रपटांतील आघाडीचे अभिनेते असूनही त्यांनी हिंदीत अगदी लहान भूमिका केल्या. त्यासाठी त्यांना दहापट पैसे मिळाले असणार, हे नक्की, असे करमकर म्हणाले.
प्रत्येकाला आपापले निर्णय घेऊ द्या
पैशांसाठी काम केले असावे, असेही करमकर म्हणाले. प्रत्येकाला आपापले निर्णय घेऊ द्या आणि दुसऱ्यांनी कसे जगायचे हे तुम्ही का ठरवता, असा सवालही त्यांनी केला. कलाकाराने कोणती भूमिका करावी, हा त्याचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट झाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा