वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, काही ग्रहांची युती ही फार शुभ मानली जाते. जेव्हा ग्रहांचा संयोग जुळून येतो, तेव्हा त्याचा प्रभाव व्यक्तीच्या करिअर, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनावर तसेच कौटुंबिक स्थितीवर दिसून येतो. नोव्हेंबर महिना जवळपास संपत आला आहे, पण नोव्हेंबरचा शेवटचा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने फार खास असणार आहे.
३० नोव्हेंबरला गजकेसरी राजयोग
३० नोव्हेंबर २०२६ रोजी चंद्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच देवगुरु बृहस्पती विराजमान आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी चंद्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी २ डिसेंबरपर्यंत चंद्र ग्रह असणार आहे. या दरम्यान गुरु ग्रहाबरोबर या ग्रहाची युती होणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग हा फार शुभ आणि प्रभावशाली मानला जातो. जेव्हा देवगुरु बृहस्पती आणि चंद्र ग्रह एकमेकांच्या केंद्रस्थानी म्हणजेच पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या चरणात स्थित असतात, तेव्हा या योगाची निर्मिती होते. ज्योतिषीय मान्यतेनुसार, हा योग बुद्धिमत्ता, सुख-समृद्धी, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थितीशी संबंधित आहे.
कोणत्या तीन राशी भाग्यशाली?
या योगाचा लाभ तीन राशींच्या लोकांना होणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग चांगले परिणाम घेऊन येणार आहे. या काळात आत्मविश्वास चांगला वाढेल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तसेच, प्रवासाचे शुभ योग जुळून येणार आहेत. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु-चंद्राची युती सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. या काळात आत्मविश्वास अधिक वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. हाती घेतलेल्या कामाला चांगली गती मिळेल. नशिबाची साथ बरोबर असणार आहे. तसेच, या कालावधीत नवीन कार्याची सुरुवात देखील करता येईल. धनु राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अनेक क्षेत्रात प्रगती घेऊन येणार आहे. या काळात नवीन प्रोजेक्टवर काम करता येईल. व्यवसायाचा विस्तार वाढेल. नवीन सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. नोकरदार वर्गातील लोकांवर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. (टीप: वरील बाबी ज्योतिषीय मान्यतेनुसार माहिती म्हणून दिल्या आहेत.)
प्रतिक्रिया व्यक्त करा