राजश्री पान मसाला जाहिरातीशी संबंधित प्रकरणात अभिनेता सलमान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य ग्राहक आयोगाने सलमान खान आणि संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने दाखल केलेली पुनरीक्षण याचिका प्राथमिक सुनावणीत स्वीकारल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली.
स्वाक्षऱ्यांच्या सत्यतेवर प्रश्न
या प्रकरणात आयोगासमोर सादर केलेल्या कागदपत्रांवरील सलमान खान यांच्या स्वाक्षऱ्या खऱ्या आहेत का, असा प्रश्न याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे. संबंधित कागदपत्रांवरील स्वाक्षऱ्या मूळ नसल्याचा दावा करत त्यांची फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून तपासणी व्हावी आणि सलमान खान यांनी स्वतः हजर राहावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र जोधपूर जिल्हा ग्राहक आयोगाने १६ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशात ही मागणी मान्य केली नव्हती. त्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने राज्य ग्राहक आयोगाकडे पुनरीक्षण याचिका दाखल केली होती.
पुढील सुनावणी जानेवारीत
या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. त्यामुळे या नोटिशीला सलमान खान आणि राजश्री पान मसाला कंपनी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा