महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सिद्धेश कदम यांनी रायगड किल्ल्यावर सौर ऊर्जेचा वापर करून प्रकाशाची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती दिली. राज्यातील अकरा युनेस्को वारसा दर्जा असलेल्या किल्ल्यांवर शुद्ध पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजनही करण्यात येणार आहे. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
अकरा गडांवर स्वच्छता मोहीम
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात आहे. २३ जानेवारीपासून, बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त, या अकरा किल्ल्यांवर गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. शिवप्रेमी आणि गडमित्र यात सक्रिय सहभाग घेत आहेत. ग्रामपंचायतींच्या सहकार्याने घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी ईव्ही ट्रॅक्टर धोरण
केवळ गडकिल्लेच नव्हे, तर शेतकरी बांधवांसाठीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण खात्यामार्फत ईव्ही ट्रॅक्टर धोरण आणले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा