आयफोन १७ बद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसत आहे आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अशातच या फोनवर आता मोठी सवलत मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व ऑफर एकत्र केल्यास आयफोन १७ तब्बल ४२ हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकतो. त्यामुळे हा फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
एक्सचेंजवर मोठी बचत
आयफोन १७ ची अधिकृत किंमत ९९,९९० रुपये आहे. नवीन फोन खरेदी करताना जुना फोन दिल्यास त्याची किंमत थेट ५७,९५० रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांचे तब्बल ४२ हजार रुपये वाचतील. उदाहरणार्थ, आयफोन १४ एक्सचेंज केल्यास त्यावर २७,१५० रुपयांचे एक्सचेंज डिस्काउंट मिळते. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर एकत्र केल्यास हा फोन सुमारे ५७ हजार रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.
ई-कॉमर्सवरही सवलत
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही आयफोन १७ वर सवलत दिली जात आहे. फ्लिपकार्टवर या फोनवर आधीच काही हजार रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे सध्याची ऑफर ही आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. मात्र, खरेदीपूर्वी ऑफरच्या अटी आणि एक्सचेंजचे मूल्य तपासून घेणे योग्य ठरेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा