राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत गेल्यास रोहित पवार यांनी आपल्यासाठी पर्यायी भूमिकेची चाचपणी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या रणनीतीमध्ये पक्ष नेतृत्वाला विश्वासात घेण्यात आलेले नाही, असेही सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेससोबत युती किंवा स्वतंत्र भूमिका घेण्यासंबंधी ही चाचपणी सुरू असल्याचे कळते.
नेतृत्वाला विश्वासात न घेता चाचपणी
रोहित पवारांकडून अशा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ओळख केली जात आहे, जे शरद पवार गट एनडीएत गेल्यास त्यांच्यासोबत राहण्यास तयार नसतील. काँग्रेस विचारांचे नेते आपल्यासोबत यावेत, यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. सध्या सुरू असलेल्या या चाचपणीमध्ये रोहित पवारांच्या टीमने संभाव्य उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची यादी तयार केली आहे. आवश्यकता वाटल्यास त्यांना तिकीटांचे आश्वासन देण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यभर मोर्चेबांधणी सुरू
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये त्यांनी यासाठी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शरद पवार गटाच्या संभाव्य एनडीए प्रवेशानंतर रोहित पवारांना आपली बाजू मजबूत करायची असल्याने ही मोर्चेबांधणी महत्त्वाची मानली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा