, २६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुण्यात भाऊ फ्लेक्स काढा मोहीम; पहिला पुरस्कार भाजप नेत्याला

पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी १५० हून अधिक अनधिकृत फ्लेक्सचे फोटो महापालिकेकडे पाठवले.

पुण्यात भाऊ फ्लेक्स काढा मोहीम; पहिला पुरस्कार भाजप नेत्याला

पुणे शहरातील बेकायदेशीर फ्लेक्स आणि होर्डिंग्जविरोधात महापालिकेने ‘भाऊ फ्लेक्स काढा’ ही मोहीम सुरू केली आहे. शहरातील रस्ते स्वच्छ केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी शहराला विद्रुप करणाऱ्या बॅनर आणि फ्लेक्सकडे मोर्चा वळवला आहे. नेतेमंडळींच्या फ्लेक्समुळे शहर विद्रुप झाल्याची तक्रार सातत्याने होत होती. हेच विद्रुपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने अनोखा मार्ग शोधला आहे. शहरात चौकाचौकांत फ्लेक्स लावणाऱ्यांना महापालिकेकडून शहर विद्रुपीकरण पुरस्कार देण्यात येत आहे.

पहिला ‘पुरस्कार’ स्थायी समिती अध्यक्षांना

शहर विद्रुपीकरणाचा पहिला पुरस्कार महापालिकेच्याच स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले भाजपचे श्रीनाथ भिमाले यांनी पटकावला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसालाच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. अतिक्रमणविरोधी आंदोलन करणारे नगरसेवक सुनील पांडे आणि पृथ्वीराज सुतार यांनीही या यादीत स्थान पटकावले आहे. भिमाले यांनी वाढदिवसाचे कारण पुढे करत फ्लेक्सबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

पोर्टलवर पहिल्याच दिवशी १५० हून अधिक तक्रारी

शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस, स्वागत, नियुक्त्या आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने ही मोहीम सुरू केली असून यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी फ्लेक्सचे फोटो काढून या वेबसाईटवर अपलोड करण्यात मोठा पुढाकार घेतला आहे. पोर्टलवर पहिल्याच दिवशी नागरिकांनी १५० हून अधिक अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्रे महापालिकेकडे पाठवली आहेत. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सविरोधात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. या पोर्टलवर नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र अपलोड करता येते आणि त्यानुसार संबंधित विभाग आणि वॉर्ड कार्यालयामार्फत कारवाई केली जाणार आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance