कार किंवा बाईक असलेल्या वाहनधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्र सरकार वाहन विम्याच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे.
नव्या प्रस्तावानुसार, सतत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना विमा नूतनीकरणावेळी जास्त प्रीमियम मोजावा लागू शकतो. तसेच वैध विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळण्यावरही निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे.
प्रस्तावामागचा उद्देश
रस्त्यावरील अपघात कमी करणे आणि जास्तीत जास्त वाहनांना विमा संरक्षण मिळवून देणे, हा या प्रस्तावामागचा उद्देश आहे. या प्रस्तावात कारसाठी चार वर्षे आणि बाईकसाठी सहा वर्षांचा विमा प्रस्तावित असल्याचेही समजते.
प्रतिक्रिया व्यक्त करा