बहुतेक परफ्युममध्ये अल्कोहोल असते. अनेकदा त्याचे प्रमाण जवळपास ९० टक्क्यांपर्यंत असू शकते. पण परफ्युममध्ये अल्कोहोल का घातले जाते, हे अनेकांना माहीत नसते. सुगंधी द्रव्ये त्वचेवर समानपणे पसरण्यासाठी आणि सुगंध हवेत पसरण्यासाठी अल्कोहोलचा वापर केला जातो.
अल्कोहोलची भूमिका काय?
अल्कोहोल हे सुगंधी घटकांसाठी वाहकाचे काम करते. ते लवकर वाफ होते, त्यामुळे सुगंध त्वचेवर समानपणे पसरतो आणि हळूहळू जाणवू लागतो. अल्कोहोलमुळेच परफ्युमची बाटली उघडताच सुगंध पसरतो आणि तो बराच वेळ टिकून राहतो.
Leave a Reply