खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चांवर थेट आणि मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ पासून म्हणजे गेल्या १२ वर्षांपासून माध्यमांमध्ये माझा शपथविधी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदाच्या चर्चांवर आपले मत मांडले. “माझ्यावर असा अन्याय करू नका,” असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
संसदेतील कामावर प्रश्न का नाहीत?
राजकीय चर्चांपेक्षा संसदेतील कामकाजावर कोणी प्रश्न विचारत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्या धोरणनिर्मितीसाठी आपण संसदेत निवडून गेलो, त्याबद्दल कोणीही गांभीर्याने विचारत नाही, असे त्या म्हणाल्या.
Leave a Reply