पुण्याच्या औंध भागातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सध्या शंभराहून अधिक रुग्णवाहिका उभ्या आहेत. १०८ या आपत्कालीन सेवेअंतर्गत आलेल्या या गाड्या अजून वापरात आलेल्या नाहीत आणि धूळ खात पडून आहेत.
उद्घाटनाची तारीखच मिळेना
या रुग्णवाहिकांचे उद्घाटन होऊन त्या सेवेत दाखल व्हाव्यात, यासाठी प्रतीक्षा सुरू आहे. मात्र आरोग्यमंत्र्यांकडून उद्घाटनासाठी तारीख मिळत नसल्याने हा विषय रखडल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याची परिस्थिती आहे. अशा वेळी पुण्यासारख्या शहरात १०० हून अधिक गाड्या निष्क्रिय अवस्थेत पडून असणे चिंताजनक मानले जात आहे.
आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह
या प्रकारामुळे आरोग्यसेवेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत. लवकरच या रुग्णवाहिकांचे उद्घाटन होऊन त्या रुग्णांच्या सेवेत दाखल व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply