आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात राजकीय मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये विधान भवनावर शेतकरी मोर्चा काढण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रिया सुळे नाराज असल्याचे बोलले जात आहे.
शेगाव ते नागपूर शेतकरी मोर्चा
रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेगाव ते नागपूर असा शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी नागपूरमध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची बातमी समोर आली. या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
या संदर्भात आज सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी ही बातमी हास्यास्पद असल्याचे म्हटले. रोहित पवार काल नागपूरला गेले होते आणि त्यांचे लाइव्ह लोकेशन तपासता येईल, असेही त्या म्हणाल्या. पक्षाची गुप्त बैठक घेतल्याची बातमी हास्यास्पद असल्याची त्यांची ही पहिली प्रतिक्रिया होती.
Leave a Reply