रायगडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. नुकताच खोपोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या १०० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद चांगलीच वाढली आहे.
खोपोलीत पक्षप्रवेश सोहळा
खोपोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदेसेनेसह अन्य पक्षातील १०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर पक्षप्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. गेल्या काही दिवसांपासून खोपोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग सुरू आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राजकीय शक्तिप्रदर्शन केले आहे.
कर्जत-खालापूरची समीकरणे बदलणार?
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या जोरदार चढाओढ सुरू आहे. या पक्षप्रवेशानंतर कर्जत-खालापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Leave a Reply