रोहित पवार यांच्या आगामी ट्रॅक्टर मोर्चाचे पोस्टर जाहीर झाले असून त्यावर शरद पवार यांचा फोटो झळकला आहे. या फोटोमुळे पक्षांतर्गत चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
बॅनरवरून फोटो गायब असल्याची नाराजी
यापूर्वी पक्षाचे चिन्ह आणि प्रमुख नेत्यांचे फोटो बॅनरवरून गायब असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आता मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
४ डिसेंबरला मोर्चा
हा ट्रॅक्टर मोर्चा ४ डिसेंबर रोजी काढण्यात येणार असून त्यासाठी हे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे. मोर्चाच्या तयारीबरोबरच पोस्टरवरील फोटोमुळे पक्षातील समीकरणांबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.
Leave a Reply