व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये मंगळवारी सकाळी एका खाण्याच्या दुकानाजवळ गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका जोरदार होता की इमारतीचा एक भाग कोसळला.
ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकून असल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट झाला तेव्हा तिथे अनेकजण जेवण करत होते.
स्फोटाचं कारण काय?
प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे. मात्र, स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
Leave a Reply