गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी देशातील शेअर बाजार बंद राहिला. सार्वजनिक सुट्टीमुळे मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) येथे समभागांची खरेदी-विक्री झाली नाही. त्यामुळे दलाल स्ट्रीटवर शुकशुकाट होता. गुरु नानक जयंती ही ‘प्रकाश गुरुपरब श्री गुरु नानक देव’ किंवा ‘प्रकाश पर्व’ म्हणूनही ओळखली जाते.
कमोडिटी बाजारात संध्याकाळी व्यवहार
शेअर बाजार बंद असला तरी सगळेच व्यवहार ठप्प नव्हते. कमोडिटी आणि ईजीआर विभागात संध्याकाळी पाच वाजल्यापासून व्यवहार सुरू झाले.
सोमवारी सेन्सेक्स १४०० अंकांनी घसरला
सुट्टीच्या आधीच्या सोमवारच्या सत्रात शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला होता. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तेजीचे वातावरण असताना या घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. वर्षातील पुढील बाजार सुट्टी २५ डिसेंबर रोजी असणार आहे.
Leave a Reply