नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफचे पैसे काढण्यासाठी क्लेमची लांबलचक प्रक्रिया करावी लागण्याची शक्यता कमी होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी UPI द्वारे PF चे पैसे काढण्याची नवीन सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.
UAN आणि UPI जोडणी
नवीन सुविधेनुसार, कर्मचाऱ्यांचा UAN म्हणजेच युनिव्हर्सल अकाउंट नंबर त्यांच्या UPI खात्याशी जोडला जाणार आहे. त्यानंतर सदस्य भीम ॲपद्वारे PF चे पैसे काढू शकतील. ही सुविधा डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत सुरू होऊ शकते, असे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.
९० टक्क्यांपर्यंत रक्कम?
१९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत EPFO च्या मंडळाने PF खात्यात ठेवावी लागणारी किमान शिल्लक २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र सदस्यांना त्यांच्या PF शिल्लकीच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकेल. मात्र, UPI सुविधेसाठी लागू होणारी नेमकी मर्यादा अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.
Leave a Reply