काही लोकांना कायम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते. पण सतत रात्री जागून काम करण्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. जे लोक नेहमीच नाईट शिफ्टमध्ये काम करतात, त्यांच्या हृदयाच्या रचनेत काही बदल दिसून आल्याचे तज्ज्ञांना जाणवले. एवढेच नाही, तर त्यांच्या रक्तातही हृदयाच्या आजारांशी संबंधित काही बदल आढळले आहेत.
संशोधनात काय आढळले?
तब्बल ४२ हजार ६७१ लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांच्या हृदयाच्या रचनेत बदल दिसून आले असून, रक्तातील हृदयाच्या आजारांशी संबंधित घटकांमध्येही बदल आढळले आहेत. हे संशोधन ‘युरोपियन हार्ट जर्नल’ या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
रात्री जागून कामाचा आरोग्यावर परिणाम
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी हे संशोधन एक इशारा मानले जात आहे. सतत रात्री जागून काम केल्याने हृदयावर होणारा परिणाम लक्षात घेता, अशा कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित तपासणी आणि योग्य जीवनशैली यामुळे धोका कमी करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Leave a Reply