मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे एआय सर्वेक्षण होणार

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वेक्षण होणार आहे. अपघातप्रवण ठिकाणे शोधण्यासाठी परिवहन विभागाने १८.४० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचे एआय सर्वेक्षण होणार

पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करताना अचानक समोर येणारा खड्डा, धोकादायक वळण, अस्पष्ट वाहतूक चिन्ह किंवा संरक्षक कठड्याचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. आता यांसह अन्य संभाव्य धोक्यांचा शोध घेण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कृत्रिम प्रज्ञेची मदत घेतली जाणार आहे. रस्त्याची स्थिती, अपघातप्रवण ठिकाणे आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे शोधून त्यावर उपाययोजना सुचवल्या जातील. या सर्वेक्षणासाठी परिवहन विभागाने १८ लाख ४० हजार ८०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

जिओ टॅगिंगद्वारे धोकादायक ठिकाणांची नोंद

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील अपघातांची कारणे शोधून आवश्यक सुरक्षा उपाययोजनांच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने महामार्गाच्या स्थितीचे सखोल मूल्यमापन केले जाईल. रस्त्यांवरील अपघातप्रवण ठिकाणे, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक चिन्हांची स्थिती, पांढरे पट्टे, संरक्षक कठडे आणि अन्य सुरक्षा सुविधांमधील त्रुटी शोधण्यात येतील. जिओ टॅगिंगद्वारे प्रत्येक धोकादायक ठिकाणाची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर रस्ता सुरक्षेतील त्रुटी, अपघातांचा संभाव्य धोका आणि त्यावर करायच्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल तयार होईल. या माहितीचा डिजिटल साठा आणि डॅशबोर्डही विकसित केला जाईल. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कोणती सुधारणा आवश्यक आहे, हे ठरवता येईल.

सर्वेक्षणाचा खर्च आणि निधी

कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित रस्ता सुरक्षा सर्वेक्षणाच्या संकल्पनात्मक चाचणीसाठी १५ लाख ६० हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यावर १८ टक्के जीएसटीचे २ लाख ८० हजार ८०० रुपये आकारले जातील. हा निधी रस्ता सुरक्षा, प्रसिद्धी व जनजागृती या योजनेंतर्गत उपलब्ध तरतुदीतून खर्च केला जाणार आहे. या सर्वेक्षणातून रस्त्यांची सद्यस्थिती आणि संभाव्य धोकादायक भागांचे मूल्यमापन, अपघातप्रवण ठिकाणे आणि संभाव्य ब्लॅक स्पॉट निश्चिती, वाहतूक चिन्हे, दिशादर्शक फलक, रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांची तपासणी, संरक्षक कठडे आणि अन्य सुरक्षा सुविधांमधील त्रुटींची तपासणी तसेच जिओ टॅगिंगद्वारे प्रत्येक ठिकाणाची डिजिटल नोंद केली जाणार आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance