मंगळवारी देवदिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमा आहे. पंचांगानुसार चंद्र आणि गुरूचा केंद्र योग असून त्याचा प्रभाव सर्व मूलांकांवर असेल. मूलांक १ साठी प्रकल्पात यश मिळण्याचा योग असून मूलांक ३ साठी कामाचे कौतुक होईल. मूलांक ६ ला नशिबाची साथ मिळेल, मूलांक ८ साठी व्यावसायिक लाभ वाढेल तर मूलांक ९ साठी वैवाहिक जीवनात गोडवा असेल. मूलांक १ ते ९ साठी मंगळवार कसा असेल, ते जाणून घ्या.
मूलांक १ ते ५
मूलांक १ साठी मंगळवारी दुपारनंतर एखादी आनंदाची बातमी किंवा अनपेक्षित घटना घडल्याने मन प्रसन्न होईल. या सकारात्मक ऊर्जेमुळे कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन आणि चांगले करण्याची प्रेरणा मिळेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना पुढे नेण्याची संधीही मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रकल्पात यश मिळण्याचे योग आहेत. आत्मविश्वास कायम ठेवा आणि मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या.
मूलांक २ साठी मंगळवारी राग आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची खास गरज आहे. छोट्याशा गोष्टीवरून दिलेली प्रतिक्रिया तुमचे होत असलेले काम बिघडवू शकते. प्रेमसंबंधांमध्येही विनाकारण वाद किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय राखा आणि कोणताही वाद वाढवू नका, अन्यथा मोठा धक्का बसण्याची भीती आहे. संयम आणि समजूतदारपणाने वागल्यास परिस्थिती थोडी ठिक होईल.
मूलांक ३ साठी मंगळवारी बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या एखाद्या समस्येतून दिलासा मिळण्याचा योग आहे. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारीही तुमच्या कामावर समाधानी राहतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्याची संधी मिळण्याचा योग आहे. त्याचा योग्य उपयोग करून अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवा.
मूलांक ४ साठी मंगळवारी एखाद्या नवीन व्यक्तीशी झालेली भेट नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण करू शकते. ही ओळख भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी समोर येतील. बऱ्याच दिवसांपासून ज्या ध्येयाबाबत संभ्रम होता, त्याबाबत परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. व्यावसायिकांना नवीन संपर्कांमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि चांगली संधी हातची जाऊ देऊ नका.
मूलांक ५ साठी मंगळवारी जुन्या मित्राची किंवा परिचित व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि मनात उत्साह निर्माण होईल. कौटुंबिक जीवनातही एखादी चांगली बातमी मिळण्याचा योग आहे. घरात मंगलकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असेल तसेच जुन्या संपर्कांचाही फायदा होऊ शकतो.
मूलांक ६ ते ९
मूलांक ६ साठी मंगळवारी नशिबाची साथ मिळण्याचे योग आहेत. बऱ्याच दिवसांपासून त्रास देणाऱ्या समस्यांवर तोडगा निघू शकतो आणि थांबलेल्या कामांना पुन्हा गती मिळेल. आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना मेहनतीचे सकारात्मक फळ मिळेल. घरात आनंदी वातावरण असेल तसेच तुमच्या आत्मविश्वासाने महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मूलांक ७ साठी मंगळवारी जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. त्यांच्याशी संवाद साधताना जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सामाजिक संपर्क वाढल्याने मानसिक समाधान मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी केलेले प्रयत्नही यशस्वी होऊ शकतात. एखादे अपूर्ण काम पूर्ण करण्याची संधी आहे. मित्रांच्या सहकार्याने नवीन योजना आखण्याचा विचारही मनात येऊ शकतो. वेळेचा सकारात्मक उपयोग करा.
मूलांक ८ साठी मंगळवारी सामाजिक कार्यातील सहभाग वाढू शकतो. नवीन लोकांशी संपर्क प्रस्थापित होतील आणि जुन्या ओळखी अधिक दृढ होतील. या संपर्कांचा कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक फायदा मिळू शकतो. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट भविष्यात नवीन संधींचे दरवाजे उघडणार आहे. तुमच्या वागण्यात सहजता ठेवा आणि लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. सामाजिक प्रतिष्ठेतही वाढ होण्याचे योग आहेत.
मूलांक ९ साठी मंगळवारी वैवाहिक जीवनात गोडवा आणि परस्परांमधील समजूतदारपणा वाढण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांमध्येही जवळीक वाढेल आणि नात्यांमध्ये नवचैतन्य अनुभवायला मिळेल. कौटुंबिक बाबतीत घरात एखाद्या मंगलकार्याच्या आयोजनावर चर्चा होणार आहे. घरातील आनंदी वातावरणामुळे मन प्रसन्न असेल. कामाच्या ठिकाणी संयमाने वागा आणि शांतपणे रणनीती आखून एक एक गोष्ट करा, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
Leave a Reply