लिबियामध्ये एका युक्रेनियन ड्रोनने रशियन नौदलाच्या युद्धनौकेवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटामुळे जहाजावर मोठी आग लागली आणि जहाज पूर्णपणे नष्ट झाले. हल्ला झालेल्या जहाजाची ओळख रशियन कॉर्व्हेट मर्क्युरी अशी पटली आहे.
ड्रोन कुठून सोडले गेले?
हा हल्ला युक्रेनच्या सुरक्षा सेवेने अज्ञात ठिकाणाहून सोडलेल्या ड्रोनचा वापर करून केला होता. पश्चिम लिबियातील युक्रेनियन लष्करी तळांवरून युक्रेनचे सागरी ड्रोन सोडण्यात आले होते. किमान चार ड्रोन रोखण्यात आले, तर दोन ड्रोन थेट जहाजापर्यंत पोहोचल्याने ते उद्ध्वस्त झाले. युक्रेन किंवा रशिया या दोघांनीही या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
जहाज बंदरात का थांबले होते?
मॉस्को आणि पूर्व लिबियन प्रशासनामधील सहकार्य करारानुसार इंधन भरण्यासाठी आणि पुरवठा घेण्यासाठी हे जहाज बंदरात थांबले होते. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला असून त्यात जहाजाचा मोठा भाग समुद्रात बुडल्याचे दिसून आले. जहाजाचा पुढचा भाग पाण्यावर दिसत होता. समुद्रात रशियन जहाजांचे संरक्षण करण्यासाठी कॉर्व्हेट मर्क्युरीचा वापर होत होता. भूमध्य समुद्रात रशियन लष्कराच्या मालवाहू जहाजांना ते संरक्षण देत होते.
Leave a Reply