अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे सामान्य माणसांचे आणि तरुणांचे लाडके बनले आहेत. एफडीए आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या कामामुळे भेसळखोरांना जरब बसली आहे. त्यांच्याविषयीच्या प्रत्येक घडामोडी आता व्हायरल होतात. पण नुकतेच त्यांच्या एका विधानाने महाराष्ट्रातील लाखो पालकांच्या छातीत धडकी भरली असेल.
मार्कांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची
मुंढे यांनी सांगितले की, त्यांना कधीही ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले नव्हते, पण तरीही ते आयएएस झाले. आतापर्यंत मुलांच्या मार्कशीटवरून त्यांचं भविष्य ठरवणाऱ्या पालकांना आता मुलांनीच मुंढेंचं उदाहरण दाखवायला सुरुवात केली, तर घराघरांत प्रशासकीय पेच निर्माण होईल, अशी चर्चा सुरू आहे.
गुण आणि यश यावर नवी चर्चा
मुंढे यांच्या या विधानामुळे गुण आणि यश यांच्या नात्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे. केवळ गुणांच्या आधारे मुलांचे भविष्य ठरवता येत नाही, हाच संदेश त्यांच्या विधानातून समोर येत असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या कामाची शैली आणि या विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
Leave a Reply