सतेज पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकरी अडचणीत आहेत. दुसरीकडे विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरीतील ८० लाख रुपये खर्च करणे म्हणजे उधळपट्टी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप मंत्र्यांचेही विधान चर्चेत
दरम्यान, भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही एक मोठे विधान केले आहे. पुस्तक फाडणे आपल्याला मान्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर या विधानांमुळे चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply