महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यांची वरदायीनी ठरलेल्या कोयना धरणातील पश्चिमेकडील जलविद्युत निर्मिती करून समुद्राला वाया जाणारे तब्बल ६७.५० टीएमसी पाणी मुंबईला पिण्यासाठी नेण्याचा घाट मागील अनेक वर्षांपासून घातला जात आहे.
यावर्षी अल निनोचा धोका आणि राज्यभर दुष्काळाची परिस्थिती या निमित्ताने राज्य शासनाकडून याबाबत पुन्हा सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र हे धाडसी पाऊल उचलण्यापूर्वी अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे.
खर्च आणि प्रलंबित पुनर्वसन
या योजनेसाठी न परवडणारा खर्च, कोयनेचे शासकीय बकालपण आणि याच धरणाच्या माध्यमातून तब्बल ६५ वर्षांपासून प्रलंबित असलेले पुनर्वसनाचे प्रश्न हे मोठे अडथळे आहेत.
सिंचन आणि वीजनिर्मितीचा ताळमेळ
सिंचन आणि वीजनिर्मिती यांचा ताळमेळ राखणेही या प्रकल्पापुढील आव्हान आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच मुंबईला कोयनेचे पाणी नेण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
Leave a Reply