नागपूरमध्ये राज्यभरातील नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांना गती देण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
हेडलाईनपेक्षा लाईफलाईन महत्त्वाची
कमी बोला, काम जास्त करा, असा सल्ला देत शिंदे यांनी नगराध्यक्षांना कानपिचक्या दिल्या. माध्यमांमध्ये चुकीची हेडलाईन देण्यापेक्षा लोकांची लाईफलाईन चांगली करण्याचे प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
दुष्काळी भागात ताकदीने काम करण्याचे आदेश
राज्यातील ६३ नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. दुष्काळी भागात ताकदीने काम करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
Leave a Reply