संगणकाचा कीबोर्ड वापरताना Ctrl, Alt आणि Shift या की डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी दोन वेळा दिसतात. एकाच कामासाठी असलेल्या या कींची पुनरावृत्ती का केली आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
मॉडिफायर की म्हणजे काय?
Ctrl, Alt आणि Shift यांना मॉडिफायर की म्हणतात. त्या इतर कोणत्याही कीसोबत दाबल्या जातात तेव्हा त्या कीचे कार्य बदलते. उदाहरणार्थ Ctrl+C ने कॉपी, Ctrl+X ने कट, Ctrl+V ने पेस्ट आणि Ctrl+S ने फाईल सेव्ह करता येते. Shift कीमुळे इंग्रजी अक्षरे कॅपिटलमध्ये लिहिता येतात.
दोन्ही बाजूंना की असण्याचा फायदा
डाव्या हाताने अक्षर टाईप करताना उजवीकडील Shift की दाबणे सोयीचे ठरते आणि उजव्या हाताने टाईप करताना डावीकडील Shift की वापरता येते. त्यामुळे टायपिंगचा वेग आणि सुलभता कायम राहते. टच टायपिंग करताना दोन्ही बाजूंना या की असल्यामुळे हाताची स्थिती नैसर्गिक राहते आणि हात वारंवार हलवावे लागत नाहीत. Alt कीचे कार्य मात्र ऑपरेटिंग सिस्टमनुसार बदलू शकते; काही कीबोर्डवर AltGr लिहिलेले असते, ज्यामुळे अतिरिक्त विशेष वर्ण टाईप करता येतात.
Leave a Reply