बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. दोघांनी पडद्यावर एकत्र काम केलेल्या चित्रपटांची संख्या पाच-दहा नसून तब्बल १६ आहे. त्यापैकी अनेक चित्रपट प्रचंड गाजले. या जोडीच्या ‘लम्हे’ या चित्रपटाला आता ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
भारतात फारसा न चाललेला, परदेशात हिट
यश चोपडा यांनी दिग्दर्शित केलेला ‘लम्हे’ १९९१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे तो भारतात फारसा आवडला नव्हता. मात्र परदेशात या चित्रपटाने तिकीटबारीवर भरपूर कमाई केली. कालांतराने या चित्रपटाला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला. चित्रपटाचा कालावधी तीन तास सात मिनिटांचा होता.
या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्याशिवाय अनूपम खेर, वाहिदा रेहमान आणि हनी इराणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. ऋचा पल्लोडही या चित्रपटात दिसली होती.
एकत्र केलेले इतर गाजलेले चित्रपट
‘लम्हे’शिवाय अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी ‘कर्मा’, ‘जांबाज’, ‘मिस्टर इंडिया’, ‘जोशीले’, ‘सोने पे सुहागा’, ‘राम अवतार’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘आसमान से गिरा’, ‘जुदाई’, ‘लाडला’, ‘गुरुदेव’ आणि ‘मिस्टर बेचारा’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. त्यांची पडद्यावरील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडायची, आणि आजही त्यांच्या जोडीची चर्चा चित्रपटप्रेमींमध्ये होते.
Leave a Reply