गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत होती. मात्र आज जळगावच्या सराफ बाजारात चित्र बदलले. सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतली असून, त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.
10 ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागणार?
आज, 23 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या भावात 2 हजार 300 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 29 हजार 574 रुपयांवर पोहोचले आहेत. सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर आलेली ही वाढ खरेदीदारांसाठी धक्कादायक ठरली आहे.
चांदीचा भाव स्थिर
सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर स्थिर असल्यामुळे एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 1 लाख 58 हजार 620 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना मात्र आज दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरातील चढ-उतार लक्षात घेता खरेदी करण्यापूर्वी बाजारातील ताजे दर तपासून घेणे योग्य ठरेल.
Leave a Reply