मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे सर्वत्र गारठा पसरला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवसांत थंडीची लाट येण्याचा इशारा दिला असून कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज ढगाळ वातावरण राहील, तर तापमानात चढउतार दिसून येतील.
राज्यातील तापमानाची स्थिती
जळगाव येथे राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली आहे. तेथे पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे. निफाड येथे १०.७ अंश सेल्सिअस, तर नाशिक आणि सातारा येथे १३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. अशा प्रकारे राज्याच्या वेगवेगळ्या भागांत तापमानात मोठा फरक दिसून येत आहे.
विदर्भात पावसाची शक्यता
अक्कान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस पडू शकतो आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
Leave a Reply