अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू असताना इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद करून अमेरिका आणि इतर देशांची कोंडी केली होती. या संघर्षात समुद्रातील हल्ले तेलवाहू आणि वायूवाहू टॅंकरवर करण्यात आले. त्याचा फटका सामुद्रधुनीतील वन्यजीवांना आणि पर्यावरणाला बसला आहे. मात्र आता सगळ्या जगाचे लक्ष एका जलतरणपटूने वेधून घेतले आहे. ते फक्त खेळाडू नाहीत, तर महासागर संरक्षकही आहेत. ब्रिटिश जलतरणपटू लुईस प्यू यांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीत सुमारे 15 किमी पोहले आहे.
हॉर्मुझमधील पर्यावरण धोक्यात
तीन दिवस आधी महासागर संरक्षक खेळाडू प्यू यांनी स्पष्ट केले होते की, इराण आणि अमेरिका यांच्यातील हल्ल्यांमुळे या सामुद्रधुनीतील वन्यजीव आणि पर्यावरण धोक्यात आले आहे. युद्धाचा किती मोठा फटका या जीवांना बसला आहे, हे त्यांनी सांगितले होते. मात्र अजूनही इराण आणि अमेरिका या दोन देशांत सुप्त संघर्ष आहे. अजूनही इराणने आपली हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली केलेली नाही. आता या संघर्षाच्या दरम्यान ब्रिटिश जलतरणपटू लुईस प्यू यांनी हॉर्मुझ पोहण्याचे धाडस दाखवले आहे. गॉगल आणि संयुक्त राष्ट्रांची टोपी घालून त्यांनी पोहण्यास सुरुवात केली. दक्षिण भागातून त्यांनी सुरुवात केली आणि हॉर्मुझच्या सुमारे 15 किमी भागात त्यांनी फेरफटका मारण्याचे धाडस दाखवले.
प्यू यांचे भावनिक आवाहन
जेव्हा प्यू लंडनमध्ये गेले तेव्हा त्यांनी सगळी हकीकत सांगितली. माझ्या डोळ्यांसमोर सुमारे 4 किमी अंतरावर बॉम्बचा आवाज आला आणि त्याने अख्खा समुद्र हलला असे वाटत होते. तेलाच्या टॅंकरवर हल्ला झाला आणि लढाऊ विमानांचे आवाज ऐकू येत होते. आपल्याला आता बाहेर गेले पाहिजे, असे वाटले. आधीची स्थिती पूर्वपदावर येण्यास काही वर्षे लागतील. युद्धाच्या दरम्यान जे टॅंकर फुटतात, त्याने समुद्रातील डॉल्फिन आणि इतर वन्यजीवांवर त्याचा परिणाम होतो, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले. मी तीन दिवस सुरक्षित होतो. बाहेर आल्यावर मी समुद्रात टॅंकरवर हल्ला होताना पाहिला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या दरम्यान प्यू हे हॉर्मुझ सामुद्रधुनीत पोहणारे एकमेव व्यक्ती आहेत.
Leave a Reply