सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

विक्रांत मेसीनं शाहरुखची पँट नीट केली; व्हिडीओ व्हायरल

मुंबईतील कार्यक्रमात विक्रांत मेसीने शाहरुख खानची दुमडलेली पँट नीट केली. या कृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून विक्रांतच्या नम्र स्वभावाचे चाहते कौतुक करत आहेत.

विक्रांत मेसीनं शाहरुखची पँट नीट केली; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेता विक्रांत मेसीने मुंबईतल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. शनिवारी, २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात अभिनेता बोमन इराणी पण हजर होता. या कार्यक्रमातला शाहरुख आणि विक्रांत मेसीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून चाहते विक्रांत मेसीचं कौतुक करत आहेत.

विक्रांत मेसीच्या कृतीने चाहते खूश

व्हिडीओमध्ये दिसतंय की शाहरुख खान, बोमन इराणी आणि विक्रांत मेसी स्टेजवर उभे आहेत. तेव्हा विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतो. शाहरुखच्या पण लक्षात येताच तो मागे वळून बघत असल्याचं दिसतं. त्यानंतर परत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावतो. विक्रांत मेसीच्या या कृतीमुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी पण त्याचं कौतुक करत आहेत.

विक्रांत मेसी खरंच शाहरुखच्या पाया पडला?

या व्हायरल व्हिडीओत विक्रांत मेसी शाहरुखच्या पायाला हात लावताना दिसतोय. त्यामुळे पहिल्यांदा बघितल्यावर असंच वाटतं की तो शाहरुखच्या पाया पडला. पण, खरं तर विक्रांत मेसी शाहरुखच्या पाया पडण्यासाठी नाही, तर त्याची ट्राऊजर नीट करण्यासाठी खाली वाकला होता. शाहरुखची पँट पाठीमागून दुमडली गेली होती. ती नीट करण्यासाठी विक्रांत मेसी खाली वाकला होता. शाहरुखच्या पण लक्षात येताच त्याने त्याचे आभार मानले. स्टेजवर एवढे लोक असताना विक्रांतने कोणताही मोठेपणा न दाखवता शाहरुखची पँट नीट केली, यामुळेच लोक त्याला आणखीन जास्त पसंत करत आहेत. शाहरुखने पण त्याला हसून धन्यवाद दिलं. लोक म्हणतायत, विक्रांत मेसी खरंच जमिनीवर पाय ठेवून राहणारा माणूस आहे. या एका छोट्या व्हिडीओमुळे विक्रांत मेसी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance