जसजसे पुरुषांचे वय वाढते, तसतसे डोक्यावरील केस कमी होतात आणि पाठीवर व छातीवर केस वाढतात. शरीरावरील केस दिसायला चांगले दिसतात, पण सर्वत्र केस असण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक पुरुषांच्या पाठीवर केस येतात. पाठीवरील अतिरिक्त केसांमुळे सतत घाम येतो, ज्यामुळे खाज सुटणे किंवा पुरळ उठणे होऊ शकते. त्यामुळे अनेक पुरुष पाठीवरील केस काढण्यासाठी सलूनमध्ये जातात. पाठीवरील नको असलेले केस काढण्याचे तीन सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. हे उपाय कायमस्वरूपी नसले, तरी तात्पुरता आराम देऊ शकतात आणि नंतर तीच प्रक्रिया पुन्हा करता येते.
पाठीवर केस का येतात?
पुरुषांमध्ये पाठीवर केस असणे सामान्य आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरात असलेल्या अँड्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सचा प्रभाव. हे हार्मोन्स केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. याव्यतिरिक्त, काही पुरुषांमध्ये अनुवांशिकता देखील पाठीवर केस येण्यास कारणीभूत ठरते. काही पुरुषांच्या पाठीवरचे केस हलके आणि विरळ असतात, तर काहींच्या पाठीवरचे केस जाड आणि दाट असतात. वाढत्या वयामुळे देखील पाठीवरील केसांच्या वाढीत बदल होऊ शकतो.
पाठीवरील केस काढण्याचे तीन उपाय
१. ट्रिमर किंवा रेझर वापरा – पाठीवरील केस सहजपणे काढायचे असतील, तर ट्रिमर किंवा रेझर वापरता येतो. ट्रिमरने केस इच्छित लांबीपर्यंत लहान करता येतात, तर रेझर त्वचेच्या पृष्ठभागावरून केस काढू शकतो. स्वतःहून पाठीवरील केस काढणे थोडे कठीण असते, म्हणून मदत घ्या आणि शेव्हिंग जेल वापरा.
२. वॅक्सिंग – पाठीवर खूप केस असतील आणि रेझर वापरल्याने ते कडक होत असतील, तर वॅक्सिंगचा विचार करा. आजकाल नेहमीच्या वॅक्सिंगसोबतच रेका वॅक्सचाही वापर केला जातो. रेका वॅक्सिंग कमी वेदनादायी असते आणि केसांची वाढही मंदावते. थोड्या वेदना सहन करू शकत असाल, तर वॅक्सिंग हा चांगला पर्याय आहे.
३. लेझर हेअर रिमूव्हल – पाठीवरील केसांपासून कायमची सुटका हवी असेल, तर लेझर हेअर रिमूव्हल हा चांगला पर्याय आहे. यामध्ये लेझरच्या साहाय्याने केसांच्या मुळांना लक्ष्य केले जाते, ज्यामुळे केसांची वाढ हळूहळू कमी होते. यासाठी अनेक सेशन्सची आवश्यकता असू शकते. बजेटची अडचण नसेल, तर हा पर्याय निवडता येतो. पाठीवरील केस काढून घेतल्यानंतर नक्की आंघोळ करा.
(टीप – वरील माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. कोणताही उपाय करण्याआधी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)
Leave a Reply