सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

रोहित पवारांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकणार

आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ४ ते ९ डिसेंबरदरम्यान शेगाव ते नागपूर न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे, जो अधिवेशनात धडकणार आहे.

रोहित पवारांचा ट्रॅक्टर मोर्चा नागपुरात धडकणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सवाल उपस्थित करत मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोणतीही घोषणा झाली नसल्याचे सांगत त्यांनी ४ डिसेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेगावपासून नागपूरपर्यंत हा मोर्चा निघणार असून तो थेट विधानसभा अधिवेशनात धडकणार आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणींवर बैठक, मुख्यमंत्र्यांना पत्र

आज विदर्भातील पदाधिकारी आणि महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शेतकरी आणि शेतमजुरांना येणाऱ्या अडचणींवर या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. मात्र मागण्यांवर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना आवाज देण्यासाठी ४ ते ९ डिसेंबरदरम्यान न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेगाव ते नागपूर असा हा मोर्चा सुरू होणार असून तो अधिवेशनापर्यंत पोहोचणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

रोहित पवार यांच्या प्रमुख मागण्या

शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी, भूमीहीन शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. फळबागांसाठी प्रति हेक्टर दीड लाख रुपयांची मदत द्यावी आणि फळबागा जगवण्यासाठी ६० हजार रुपयांची मदत मिळावी, अशीही त्यांची मागणी आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, एक रुपयात पीकविमा योजना सुरू करावी, मायक्रो फायनान्सची वसुली थांबवावी आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा मोठ्या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance