रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पुस्तक फाडणं मान्य नाही; आशिष शेलार यांची स्पष्ट भूमिका

भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुस्तक फाडण्याच्या कृत्यावर भूमिका मांडली. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुस्तक फाडणं मान्य नसल्याचं सांगितलं.

पुस्तक फाडणं मान्य नाही; आशिष शेलार यांची स्पष्ट भूमिका

शिंदे गटाच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचं पुस्तक फाडलं होतं. शिंदे गटाच्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला गेला होता. त्यावरून एकच राजकारण तापलं होतं. या घटनेची चर्चा असताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुस्तकावर मोठं भाष्य केलं आहे. पुस्तक फाडणं मान्य नसल्याचे शेलार यांनी सांगितले.

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाष्य

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी भाष्य केलं. शेलार म्हणाले, ‘पुस्तक, साहित्य निर्मिती लोकांना प्रगल्भच करते. केवळ सवय म्हणून नाही, लोकांना घडवायला पुस्तक महत्त्वाचं आहे. पुस्तक फाडणं मला मान्य नाही. मी कधी पुस्तक फाडलं नाही. ना कधी पंतप्रधानांचा निर्णय फाडला.’

पुढे म्हणाले, ‘लोकशाही संसदसे नही सडकसे चलेगी. ही भाषा बोलली जाते. तेव्हा अशा पुस्तकाची गरज आहे. याचा अर्थ अराजकता असा आहे.’

कार्यक्रमातील भाषणानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीका केली. डिलिमिटेशन विधेयकावर शेलार म्हणाले, लोकहिताची भूमिका सरकार घेत आहे. तर राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्याचे आशिष शेलार यांनी टाळले.

इतर मुद्यांवरही भूमिका

अजितदादा अपघात प्रकरणावर शेलार म्हणाले, ‘सगळ्या राजकीय पक्षांची चौकशीची मागणी आहे. सुनील तटकरेंनीही तेच मांडलं.’ तर आनंदराज आंबेडकर वक्तव्यावर म्हणाले, ‘कुठल्याही पक्षाच्या दिवंगत नेत्याबाबत बोलताना काळजी असावी. संयम बाळगला पाहिजे असं माझं मत आहे.’

टिपू सूलतान प्रकरणावर म्हणाले, ‘संजय राऊतांची अफजलखानाच्या वधाबाबत काय भूमिका आहे. शिवरायांनी कोथळा बाहेर काढला होता, याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी.’

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘अतिशय सुंदर पुस्तकाच प्रकाशन आज होत आहे. विजय चोरमारे यांनी निवडणुकांचा इतिहास मांडला आहे. आपल्या देशात मतदारांनी जर मनावर घेतलं तर कुणालाही निवडून आणू शकतात. माझ्या वेळेस देखील लोकांनी १ १ रुपया गोळा करून मला निवडून आणलं. मी फाटका होतो, तरी मला निवडून आणलं. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने आमची निवडणूक हातात घेतली होती. लोकांनी वर्गणी देऊन मला निवडून आणलं होतं. हा सगळा प्रभाव चळवळीचा आहे.’

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance