भारतीय रिझर्व्ह बँकेने काही विशिष्ट व्यवहारांसाठी एक्सपोर्ट डिक्लेरेशन फॉर्म, म्हणजेच EDF, सक्तीचा केला आहे. हा फॉर्म मुदतीच्या आत भरला गेला नाही, तर संबंधित व्यापाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा नियम महत्त्वाचा ठरतो.
EDF फॉर्म म्हणजे नेमकं काय?
परदेशात एखादी वस्तू निर्यात केल्यावर त्यातून मिळणारं उत्पन्न भारतातील करंट खात्यात जमा करण्याच्या अगोदर कंपन्यांना EDF फॉर्म भरावा लागणार आहे. निर्यातीशी संबंधित व्यवहारांची माहिती या फॉर्ममधून दिली जाते.
व्यापाऱ्यांच्या जबाबदारीत भर
यूपीआय एमडीआरनंतर व्यापाऱ्यांच्या जबाबदारीत आणखीन भर पडली आहे. नव्या नियमांमुळे निर्यातदारांना आपल्या व्यवहारांची नोंद वेळेत करणं आवश्यक झालं आहे. मुदतीत फॉर्म न भरल्यास दंड किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे व्यापाऱ्यांनी या नियमांची माहिती घेणं गरजेचं आहे.
Leave a Reply