दुष्काळामुळे गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. शेतातील पिके जळून खाक झाली आहेत. कधी काळी बागायती असलेले शेतमळे आज वाळून गेले आहेत. वर्षभराचे कष्ट आणि खर्च वाया गेला आहे.
सांगवी गावातील भीषण परिस्थिती
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सांगवी गावात पाण्याच्या भीषण तुटवड्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पोटच्या पोराप्रमाणे जपलेला ऊस डोळ्यांसमोर वाळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. वर्षभराचे कष्ट आणि खर्च वाया गेल्याने उत्पन्नाची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही.
उत्पन्न सोडा, खर्चही मिळेना
गावातील दुष्काळाची स्थिती सांगताना हताश झालेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात झटकन पाणी येते. उत्पन्न सोडा, साधा खर्चही मिळणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाने सांगवी गावाची दैना केली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
Leave a Reply