लिंबाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. लिंबू जेवणाची चव वाढवतो. बाजारातून आणलेले लिंबू आठवडाभर ताजे आणि टवटवीत राहावेत, यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करता येतात.
उष्णतेपासून दूर ठेवा
लिंबू गॅस किंवा स्टोव्ह यांसारख्या उष्ण तापमानाच्या ठिकाणी ठेवणे टाळावे. लिंबू कोरड्या जागी ठेवावेत. उष्णतेपासून दूर ठेवल्यास लिंबू जास्त काळ ताजे राहतात.
साठवणुकीची योग्य पद्धत
लिंबू घट्ट प्लास्टिकच्या पिशवीत ठेवणे टाळावे. प्लास्टिकच्या टोपलीमध्ये लिंबू साठवून ठेवल्यास ते अधिक काळ टिकतील आणि ताजे राहतील. साठवणुकीची ही सोपी पद्धत वापरल्यास आठवडाभर लिंबू चांगल्या स्थितीत राहतात.
Leave a Reply