सोशल मीडियावर अनेक मराठमोळ्या अभिनेत्री त्यांचे फोटो शेअर करत असतात. नुकतेच अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिचे काही पारंपरिक फोटो शेअर केले आहेत आणि ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मराठमोळा लूक
या फोटोशूटसाठी तितिक्षाने खास मराठमोळा लूक केला आहे. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. साजेसा मेकअपसह तिने गळ्यात नेकलेस, हातात बांगड्या, छोटे कानातले आणि टिकली असा साज केला आहे. तिचा हा लूक खूपच सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
सूर्यफुलासह फोटोशूट
या फोटोंपैकी एका फोटोत तितिक्षाने हातात सूर्यफूल घेतले आहे आणि त्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे. या फोटोतील तिचे हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सध्या तितिक्षाचे फोटो सर्वांनाच आकर्षित करत आहेत.
Leave a Reply