मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्यातील वाहनांना भीषण अपघात झाला आहे. ताफ्यातील चार वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. सर्वजण सुरक्षित आहेत. छगन भुजबळ ज्या वाहनात होते, त्या वाहनाला काहीही झाले नाही.
ओतूर दौऱ्यावर जाताना घटना
छगन भुजबळ आज पुणे जिल्ह्यातील ओतूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी जात असताना हा अपघात झाला. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे राज्यव्यापी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन होत आहे.
या अधिवेशनासाठी राज्यभरातून मान्यवर आणि कार्यकर्ते दाखल होत आहेत. या अधिवेशनाला मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.
Leave a Reply