सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली. त्यामुळे आज ग्राहकांना सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला.
२४, २२ आणि १८ कॅरेटचे दर
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४९० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना १,२५,०८० रुपये खर्च करावे लागतील. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,९०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना १२,५०,८०० रुपये खर्च करावे लागतील.
आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ४५० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना १,१४,६५० रुपये खर्च करावे लागतील. २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ४,५०० रुपयांची घसरण झाली. हे सोनं खरेदीसाठी आज ग्राहकांना ११,४६,५०० रुपये खर्च करावे लागतील.
२४ आणि २२ कॅरेटपाठोपाठ १८ कॅरेटचे सोनं देखील आज स्वस्त झाले आहे. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ३७० रुपयांनी स्वस्त झाले आहे. हे सोनं खरेदीसाठी ग्राहकांना ९३,८१० रुपये खर्च करावे लागतील. १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात ३,७०० रुपयांची घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ग्राहकांना ९,३८,१०० रुपये खर्च करावे लागतील.
चांदीचे दर स्थिर
आज सोनं स्वस्त झाले असले तरी चांदीच्या दरात कोणताही बदल झाला नाही. आज १ ग्रॅम चांदीचा दर १७५ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा आजचा दर १,७५,००० रुपये इतका आहे. लग्नसराई असल्यामुळे ग्राहक सोनं-चांदी खरेदी करत आहेत. अशामध्ये सोनं-चांदीच्या दरातील घसरण असल्यामुळे त्यांच्या खिशावर जास्त ताण येत नाही.
Leave a Reply