राज्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे दुष्काळी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील पिके करपून गेली आहेत. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे गावागावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदाच्या दुष्काळाने १९७२ च्या दुष्काळालाही मागे टाकले आहे.
रब्बी पेरणी इतिहासातील सर्वात नीचांकी
सुपर अल निनोमुळे रब्बी हंगामात इतिहासातील सर्वात नीचांकी पेरण्या झाल्या आहेत. रब्बी हंगामात केवळ साडे चौदा लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. डिसेंबर अखेर २५ लाख हेक्टरवरही पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
१९७२ च्या दुष्काळाशी तुलना
१९७२ च्या दुष्काळातही राज्यात ४० लाख २९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामानाने यंदा पेरण्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. खरीपणानंतर रब्बी हंगामही संकटात सापडला असून कृषी विभागाच्या आकडेवारीतून ही भयंकर परिस्थिती उघड झाली आहे.
Leave a Reply