पंतप्रधानांनी उद्योगपतींना उद्देशून एक प्रश्न उपस्थित केला आहे. बारा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करण्यात आला असतानाही कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले का, असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधी यांचा हल्लाबोल
पंतप्रधानांच्या या विधानानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. हा उद्योगपतींबाबतचा आरोप नसून पंतप्रधानांची कबुली असल्याचे राहुल गांधी म्हणाले. कर कमी करूनही पगार वाढवले गेले नाहीत आणि नोकऱ्याही निर्माण झाल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
देशातील संपत्तीवरून टीका
उद्योगपतींची भूक इतकी आहे की पोट भरतच नाही, असे पंतप्रधान म्हणाल्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी त्यावर भाष्य केले. विमानतळे, बंदरे, खाणी, जंगले, वीज, कोळसा आणि रस्ते ज्यांच्या नावावर करण्यात आले, त्यांनी किती नोकऱ्या निर्माण केल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देशाने लूट पाहिली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Leave a Reply