शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची कायदेशीर लढाई आता निर्णायक वळणावर आली आहे. एकीकडे न्यायालयात पुरावे आणि व्हीपच्या वैधतेवर जोरदार युक्तिवाद सुरू असताना, दुसरीकडे सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी फेब्रुवारी महिन्यात निकाल येईल, असे भाकीत वर्तवले आहे.
शिंदे गटाचा युक्तिवाद
१७ नोव्हेंबरला शिंदे गटाने २१ जून २०२२ च्या बैठकीचा आणि व्हॉट्सअॅप संदेशाचा मुद्दा न्यायालयात मांडला. शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, २१ जून २०२२ रोजी ठाकरे गटाने बोलावलेल्या बैठकीचा कोणताही विशिष्ट अजेंडा नमूद नव्हता. बैठकीचा संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता.
सुनावणी अंतिम टप्प्यात
या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची, या प्रश्नावर फेब्रुवारीत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply